Breaking


पुणे : एचएसबीसी (HSBC) आणि विप्ला फाउंडेशनचे गरजुंना किराणा वाटप


पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी परिसरात राहणाऱ्या अंध, अपंग, निराधार, विधवा, घरेलू अशा वंचित १५० कुटुंबाना  आणि पुणे शहरातील पर्वती, शिवाजीनगर, येरवडा येथील ७० कुटुंबाना एचएसबीसी आणि विप्ला फाउंडेशन या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दोन महिने पुरेल इतका किराणा किट वितरित करण्यात आले.


संस्थेच्या महिला, युवती सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाअंतर्गत विशेष सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण संस्था देते. हातावर पोट असलेल्या असुरक्षित रोजगार आणि आर्थिक चणचण उपेक्षित वर्गामध्ये आहे. त्यांची दिवाळी सुखमय करू, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करू, या ध्येयानुसार संस्था किराणा मदत देतेय, मात्र घरातील १० वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या किंवा शिक्षण घेता आले नाही, अशा गरजू महिला युवतींना संगणक प्रशिक्षण देऊन किमान उत्पन्नाची नोकरी मिळवून देण्याचा आम्ही यशस्वी कार्यक्रम संस्था राबवत आहे. असे प्रकल्प समन्वयक विनोद भालेराव यांनी सांगितले.


विपला फाउंडेशनचे प्रमुख पदाधिकारी जैद कापडी, प्रवीण जाधव, विनोद भालेराव, गायत्री दीक्षित, विश्वनाथ बी व्ही, शेहबाज मुल्ला, आदिनाथ जगताप, अश्वजित जाधव यांचे हस्ते किराणा वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन दिपक जाधव, वैशाली गायकवाड, कृतिका शिंदे, सुचित्रा मारणे, ज्योती जगताप, उमेश दारवटकर, वैशाली कोळेकर यांनी केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा