Breaking

पुणे : शिवजन्मभूमी च्या शिरपेचात मनाचा तुरा, मंत्रा मंगेश कुऱ्हे हिचा विक्रम


नारायणगाव / रवींद्र कोल्हे : सावरगाव, तालुका जुन्नर येथील सागर कन्या अर्थात सागर भरारी घेणाऱ्या " मंत्रा मंगेश कुऱ्हे" हिने "एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया" हे १५ किलोमीटर"चे सागरी अंतर केवळ २ तास ५१ मिनिटांत म्हणजेच सर्वात कमी वेळात पोहून पार केले. मुलींमध्ये सर्वात कमी वेळात विक्रम केला.


कुमारी मंत्रा हिने पोहण्याचा स्पर्धेत आजवर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तिने पोहणे या क्रीडा प्रकारात केलेल्या विक्रमांची नोंद "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" २०२१ मध्ये नुकतीच झाली आहे.

मंत्राच्या या कामगिरीचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. तिच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यात असेच अनेक विक्रम करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! अशा शब्दात खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी कुमारी मंत्रा हिस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा