Breakingपुणे : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' साजरा !


हडपसर / डॉ. अतुल चौरे : एस. एम. जोशी कॉलेज येथे समुपदेशन केंद्र आणि  मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने  'जागतिक मानसिक आरोग्य दिन' साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या शुभहस्ते पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.


याप्रसंगी बोलताना डॉ. खिलारे म्हणाले, मानसिक आरोग्य आजच्या परिस्थितीत कसे महत्त्वाचे आहे. तसेच आजच्या काळातील मानसिक आरोग्याचे महत्त्व सांगितले. तसेच मानसिक आरोग्य जनजागृती या विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टरचे उद्घाटन करण्यात आहे.  

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. संजय जडे उपस्थित होते. यावेळी समुपदेशन केंद्राचे प्रमुख प्रा. निशा गोसावी, मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. महेश देवकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली शिवरकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा