Breakingचांदवड येथे रेणुका मातेचा नवरात्र उत्सव उत्साहात सुरु


चांदवड, (सुनिल सोनवणे) : आज (ता.७) श्री रेणुका माता मंदिर चांदवड या ठिकाणी नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. सलग दोन वर्ष रेणुका मातेचे दर्शन भाविकांना झाले नाही, महाराष्ट्र सरकारने आजपासून मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड आनंद व उत्साह बघावयास मिळाला. यावेळी करोनाचे नियम पाळून मास्क वापरूनच भाविकांनी पहिल्याच दिवशी ट्रस्ट व पोलीस प्रशासनास सहकार्य केले.


आज चांदवड या ठिकाणी प्रातः आरती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार व सौ पगार यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करून संपन्न झाले. यावेळेस रेणुका मातेच्या उद्घोषाने रेणुका माता परिसर रेणुका मातेच्या जयजयकाराने दुमदुमून गेला.


आज सकाळी भल्या पहाटे निमगाव शिर्डी येथील सप्तशृंगी महिला मंडळ, मालेगाव, सोयगाव येथील शंभूराजे मित्र मंडळ, सप्तशृंगी मित्र मंडळ ओझर, निफाड अशा नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून ज्योत नेण्यासाठी मंडळांचे महिला कार्यकर्ते व मंडळांचे कार्यकर्ते ज्योत घेऊन जाताना त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसत होता.


चांदवड रेणुका देवी ट्रस्टच्या वतीने व्यवस्थापक सुभाष पवार यांनी ट्रस्टच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. सकाळच्या आरतीस रवींद्र पगार यांचे सह विजय जाधव, नवनाथ आहेर, सुनील कबाडे, प्रकाश शेळके, ज्ञानेश्वर काळे, रघुनाथ आहेर, यु के आहेर, सुनिल सोनवणे, कैलास सोनवणे व तालुक्यातील असंख्य रेणुका माता भाविक भक्त उपस्थित होते.


रेणुकादेवी ट्रस्टच्यावतीने व्यवस्थापक मधुकर पवार व सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार, पुजारी अमोल कुलकर्णी, हरेन्‍द्र वैद्य, विजय जोशी, नारायण कुमावत, हरी कासव, खंडू आहेर व संतोष जगताप यांनी मंदिरातील पूजा व व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे केली. देवी मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची दुकाने लावण्यास मनाई केलेली असल्याने त्या ठिकाणी कोणतीही दुकाने चालू नाहीत.


यावेळी चांदवड पोलीस स्टेशन व राज्य राखीव पोलीस बल पुणे, चांदवडचे 'पोलीस निरीक्षक बारवकर, एपीआय जाधव, पीएसआय राठोड, (पुणे राखीव पोलीस दलचे) पीएसआय बुधावले, चंद्रकांत पवार, नरेंद्र सैंदाणे, डोंगरे, विजय जाधव, व पोलीस स्टेशन चांदवड व पुणे राखीव पोलीस दलचे ५० कर्मचारी व चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा