Breakingकृषी विद्यापिठ दापोली तर्फे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दापोलीत स्वच्छता अभियान


रत्नागिरी : आज 2 ऑक्टोबर 2021 रोजी कृषी महाविद्यालय दापोली येथील राष्ट्रीय सेवा योजना याच्या अंतर्गत आणि नगरपंचायत दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने एसटी स्टँड दापोली येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 


या स्वच्छता अभियानात कृषी महाविद्यालय दापोली येथील 22 विद्यार्थी उपस्थित होते. या स्वच्छता अभियानाचे नियोजन जिशान सारंग आणि अजित सिंग यांनी केले. या अभियान कार्यक्रमास मुलांना प्रोत्साहन देण्याकरता कृषी महाविद्यालय दापोली याचे सहयोगी अधिष्ठाता  महाडकर सर, विद्यार्थी परिषद चे उपाध्यक्ष दांडेकर सर, महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजनेचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पाठक सर व कार्यक्रम अधिकारी अमित देवगिरीकर उपस्थित होते. 

हे अभियान यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता देवगिरीकर सर यांनी मार्गदर्शन केले.  विद्यापीठाचे विद्यार्थी तसेच दापोली नगरपंचायत येथील कर्मचारी यांनीही या अभियानात सहभाग घेतला. 

या उपक्रमा दरम्यान विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी मिळून बस स्टैंड व सभोवतालचा परिसर स्वच्छ केला. व त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी विविध दुकानांना आणि जवळपासच्या लोकांना भेट देऊन त्यांना स्वच्छते बद्दल चे प्रबोधन केले.

यामध्ये अजित सिंघ, विनय भेरे, प्रथमेश जाधव, आदित्य देशमुख, तलहा अराई, विश्वनाथ वालावलकर, हर्षल कदम, अब्दुल नाडकर, हृत्विक उमटे, विनय जळगावकर, आदित्य सावंत, अंकित खैरे, जिशान सारंग, नम्रता गायकर, अनुजा पाटकर, राखी खोत, नीलम जळगावकर, ऐश्वर्या भेकरे, श्रेया आंब्रे, स्वरदा रेगे, मिसबाह दिनवरे, साक्षी साळवी यांच्यासह कृषी विद्यापीठ दापोली तील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कृषी महाविद्यालय दापोलीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा