Breakingसुरगाणा : माळे दुमाला शिवारात कार व मोटर सायकलाचा भीषण अपघातसुरगाणा (दौलत चौधरी) : दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला शिवारात रोकडपाडा येथील मोटर सायकलस्वार माधव खंडू बंगाळ हे काल एकाला कामावर सोडून घरी परतत असताना माळे दुमाला शिवारात चारचाकी कार क्रमांक GJ.15. CK.1633 या चारचाकी कारने MH.15. HJ.9585 या क्रमांकाच्या मोटार सायकलला जोरदार धडक दिली. यावेळी मोटार सायकलस्वार माधव खंडू बंगाळ राहणार रोकडपाडा हे जागीच ठार झाले. त्यांना वणीच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. अपघात एवढा भीषण होता कि दोन्ही गाड्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा