Breakingमहाविकास आघाडीने दिली ११ ऑक्टोबरला "महाराष्ट्र बंद"ची हाक !


मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.


लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीने ४ शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. तसेच त्या संदर्भातील एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्याचा निर्णय महाविकास आघाडी (राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना) ने घेतला आहे. या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.


लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारामुळे देशभरातील वातावरण तापले असून सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. या हिंसाचारात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून यात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा