Breakingशहर स्वच्छ ठेवण्यासाठी फेरीवाला सक्रीय राहील - काशिनाथ नखाते


महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात फेरीवाल्यांकडून स्वच्छता अभियान


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर कामगार नगरी म्हणून ओळखली जाते, या शहराला स्वच्छ शहर म्हणून ओळख होण्यासाठी फेरीवाल्या हा प्रयत्नशील असतो. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे संत गाडगे बाबा स्वच्छ फेरीवाला अभियान राबवण्यात आले.


महाराष्ट्र हॉकर फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे हे अभियान राबविण्यात आले. यापुढेही विविध ठिकाणी असे अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, संघटक अनिल बारवकर, सागर बोराडे, फरीद शेख, अंबालाल सुखवाल, सुधीर गुप्ता, नितीन भराटे, सय्यद आली, संभाजी वाघमारे, मनोज गुप्ता, सहदेव होनमने उपस्थित होते. 


यावेळी नखाते म्हणाले की, भाजीविक्रेते, फळविक्रेते यांनी त्यांच्या खराब झालेला माल व अनपेक्षित वस्तू आजूबाजूला न टाकता व्यवस्थितरीत्या विल्हेवाट लावावी. त्याचबरोबर आपल्या हातगाडी, पथारी, स्टॉल शेजारी दिवसातून तीन वेळा स्वच्छता करावी, यामुळे ग्राहकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल त्याचबरोबर स्वच्छतेसह टापटीप परिसर ठेवल्यामुळे ग्राहक वाढीस मदत होईल. आपल्याकडील वस्तू स्वच्छ व दर्जेदार ठेवण्यासाठी फेरीवाल्यांनी नेहमी प्रयत्नशील रहावे पिंपरी-चिंचवडला स्वच्छ पुरस्कार मिळण्यासाठी फेरीवाल्यानी प्रयत्नशील रहावे, असेही नखाते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा