Breaking


भोसरी ते जुन्नर पीएमपीएमएलची बससेवा सुरू करण्याची आ. अतुल बेनके यांची मागणी



जुन्नर, ता.२६ : काही दिवसांपूर्वी भोसरी ते मंचर पीएमपीएमएलची बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता भोसरी ते जुन्नर या मार्गावर पीएमपीएमएलची बस सेवा सुरु करण्याची मागणी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी केली आहे.


आ. बेनके यांनी निवेदनात म्हटले आहे की, पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह राज्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक, नागरिक हे शिवजन्म भूमी किल्ले शिवनेरी, जुन्नर, नारायणगाव, ओझर, लेण्याद्री येथे ये - जा करत असतात. नारायणगाव, जुन्नर परिसरातील नागरिक व कामगार, विद्यार्थी हे खाजगी वाहनाने प्रवास करत आहेत. 


तसेच, जुन्नर, नारायणगाव हे शहर झपाट्याने वाढत आहे, दर रविवारी पर्यटन तसेच शिवभक्त मोठ्या प्रमाणावर किल्ले शिवनेरी या ठिकाणी येत असतात. तसेच अष्टविनायकापैकी दोन स्थळे जुन्नर तालुक्यात असल्यामुळे गणेश भक्तांची ये-जा असते. तरी पर्यटक नागरिक व भाविक यांची गैरसोय लक्षात घेता भोसरी ते जुन्नर मार्गावर पीएमपीएमएलची बससेवा सुरू करावी अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

1 टिप्पणी: