Breaking


"आज का रावण नरेंद्र मोदी" ट्विटरवर ट्रेंड


मुंबई, ता. १५ : आज देशभरात दसरा अर्थात विजयादशमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राजकीय नेते देखील आपल्या वेगवेगळ्या सभा आणि मेळावे घेत आहेत. या दिवशी चुकीच्या आणि पापी गोष्टींचा नाश म्हणून रावण दहन केले जाते. असे असतानाच आज सकाळीच ट्विटरवर "आज का रावण नरेंद्र मोदी" हा ट्रेंड बघायला मिळाला.


ट्विटरवर आज सकाळी आठच्या सुमारास "#आज_का_रावण_नरेंद्र_मोदी" हा ट्रेंड तिसऱ्या नंबरवर ट्रेंड होताना दिसला. हा ट्रेंड शेतकरी आंदोलनाला घेऊन चालविण्यात आला. मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आणि लखीमपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्येच्या विरोधात ट्विट केलेले आहेत.

1)

   

2) 

3) 

4) 

5) 

6) 

7) 

8) 

तसेच, आज किसान एकता मोर्चाच्या वतीने विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. 


दरम्यान, या ट्रेंडवर देखील काहींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आरजेडी नेता सुरेंद्र यादव यांनी ट्विट करून या ट्रेंडवर म्हटले आहे की, "या हॅशटॅगचा तीव्र निषेध व्यक्त केला पाहिजे. असे हॅशटॅग ट्रेंड करणे चुकीचे आहे, किमान त्या पदाच्या प्रतिष्ठेची काळजी घ्या." 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा