Breaking

अन्न विक्रेते, हातगाडी, स्टॉल धारकांना प्रशिक्षण ; ग्राहकांना उत्तम दर्जाचे अन्न द्यावे - काशिनाथ नखातेपिंपरी, दि.२९ : पिंपरी-चिंचवड शहरातील वडापाव, भेळ, पाणीपुरी, चहा, ज्युस, फळे, भाजी यासह अन्न विक्री करणाऱ्या हातगाडी, पथारी, स्टॉल धारकांना संत गाडगेबाबा स्वच्छता फेरीवाला अभियानाअंतर्गत दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबीरात अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी त्याचबरोबर स्वच्छ, ताजे व आरोग्यदायी अन्न ग्राहकांना पुरवून आपल्या ग्राहक संख्या वाढवून व्यवसाय वृद्धिंगत करावा असे मत महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले .


नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे चिंचवडगाव येथे हे प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले. यावेळी विक्रेत्यांना अप्रोंन, हातमोजे, मास्क, हेड कैप, वितरण करण्यात आले.


यावेळी कार्याध्यक्ष इरफान चौधरी, प्रदेश संघटक अनिल बारवकर, महिला विभागाच्या वृषाली पाटणे, रंजना जाधव, माणिक सगरे, सय्यद आली, लक्ष्मण मेहेर, संभाजी वाघमारे, फरीद शेख, रमेश ढगे, उमर तांबोळी, रामा बिराजदार, सुधीर गुप्ता, नागनाथ लोंढे, नितीन भराटे, सूशेन खरात, शांता काळोखे  उपस्थित होते.


यापुढे नखाते म्हणाले, आपण ग्राहकांना देत असलेल्या कच्चा माल दर्जात्मक तयार करुन तो सुरक्षितरीत्या ठेवून त्यावर आवरण झाकून  व्यवस्थितरीत्या ठेवण्यात यावे. धूलिकण, किटक यामुळे नुकसान होऊ शकते, खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणारे तेल चांगल्या पद्धतीचे असावे, तसेच अन्न उघडे न ठेवता त्याच्यावरती आवरण करावे. या खाद्यपदार्थसाठी पाणी हे सुद्धा निर्जंतुकीकरण केलेले असावे आवश्यक तेथे  विक्रेत्याने हात मोजे वापरावे. अन्न हे सुरक्षित असावे आणि उत्तम दर्जाचे कसे देता येईल याचा प्रयत्न करावा आणि फेरीवाल्यांसमोर आता स्पर्धेचे युग असल्याने व्यवसायामध्ये अत्यंत दर्जात्मक सुविधा देऊन आपण ग्राहकांच्या समाधानाकडे लक्ष द्यावे असे मत नखाते यांनी व्यक्त केले. यावेळी अनिल बारवकर यांनी प्रस्तावना केली तर आभार अमृत माने यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा