Breaking


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते उदघाटन


चांदवड, (सुनिल सोनवणे): कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.भारती पवार यांचे चांदवड येथे आगमन होताच फटाक्यांची ढोल-ताशांची आतिषबाजी करून केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.


यावेळी डॉ. भारती पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार डॉ.राहूल आहेर होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे व उपसभापती नितीन आहेर यांनी केले.


केंद्रीय मंत्री डाॅ.भारती पवार यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे


● चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय हे महाराष्ट्रातील सर्वात चांगली कार्यालय असल्याचे व इतर बाजार समित्यांनी या कार्यालयाचा आदर्श घ्यावा असे गौरवोद्गार काढले.

● नाफेडच्या माध्यमातून कांदा केंद्र सुरू करण्यासाठी मी स्वतः केंद्राकडे पाठपुरावा करेल व संचालक मंडळाबद्दल मनापासून गौरवोद्गार काढले

● बाजार समितीने जे पेट्रोल पंप नियोजित केले आहेत त्याठिकाणी सीएनजी पंप सुद्धा सुरू करावेत व त्यासाठी मदतीचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

● बाजार समिती ही फक्त शेतकऱ्यांची आहे पक्षाचे जोडे बाहेर काढून बाजार समितीत कोणत्याही प्रकारचे पक्षीय राजकारण नको या ठिकाणी फक्त शेतकरी हितालाच प्राधान्य द्यायला हवे.

● किसान रॅलीच्या उपलब्धतेसाठी विशेष किसान रेल शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असेल त्यासाठी मी प्रयत्न करेल असे आश्वासन देण्यात आले.

● चांदवड तालुक्याने प्रचंड मताधिक्य दिल्यामुळेच व संपूर्ण मतदारसंघात प्रथम क्रमांकावर मतदान केल्यामुळेच मला या का पदापर्यंत पोहोचता आले. त्यामुळे संपूर्ण चांदवड तालुक्यातील जनतेचे आभार केंद्रीय मंत्र्यांनी मानले व क्लस्टर व स्टोरेज च्या बाबतीत जर आपण काही प्रपोजल दिले तर त्यासाठी मदत करण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आले.

● आरोग्यमंत्र्यांनी यावेळी कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले समृद्ध भारत आत्मनिर्भर भारत पुढे नेण्यासाठी सगळ्यांचा विश्वास व आशीर्वाद असाच राहो व या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

● कोरोनाची लढाई अजून संपली नसल्याने आपण सर्वांनी अजूनही काळजी घेण्याचे व मास्क वापरण्याचे आवाहन आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री डाॅ.भारतीताई पवार यांनी केले.


यावेळी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर व कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरीवर्ग, व्यापारीवर्ग तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी, हमाल, व्यापारी तसेच विक्रम बाबा मार्कंड, निवृत्ती घुले, विलासराव ढोमसे, अशोक व्यवहारे, मोहन शर्मा, शिवसेना तालुका अध्यक्ष शांताराम भवर, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, बाळासाहेब माळी, गीता झालटे, पूजा ठाकरे, पंढरीनाथ खताळ, अण्णासाहेब आहेर, कलावती गुंजाळ, प्रवीण हेडा, इंदुबाई वाघ, भिकाशेठ अग्रवाल, बाळासाहेब वाघ, माणिकराव थोरे, मनोज बांगरे, निलेश काळे आदींसह असंख्य कार्यकर्ते व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा