Breakingलहान मुलांच्या कोव्हिडं प्रतिबंधात्मक लसीला मंजुरी ?


नवी दिल्ली : सध्या देशातील करोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे, मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे, असे असतानाच लहान मुलांच्या कोव्हिडं प्रतिबंधात्मक लसीकरणाला मंजुरी दिल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र हे वृत्त अधिकृत नसल्याचे एएनआयने म्हटले आहे,


देशातील २ ते १८ या वयोगटातील लहान मुलांना भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन (Covaxin) या करोना प्रतिबंधात्मक लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र या लसीला अदयाप मंजुरी देण्यात आली नसल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने  अधिकृत माहितीच्या आधारे दिले आहे.


कोव्हॅक्सिन ही भारतीय बनावटीची लस असून भारत बायोटेक आणि ICMR ने मिळून कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे. करोना विषाणूविरूद्ध क्लिनिकल चाचण्यांमध्ये Covaxin जवळजवळ ७८ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रोढ नागरिकांप्रमाणेच २ ते १८ वयोगटातील मुलांना सरकारी दवाखान्यात ही लस मोफत दिली जाणार आहे.


दरम्यान, संभाव्य करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना जास्त धोका असल्याचे बोलले जात होते, अशातच कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी मिळाल्यास ही दिलासादायक बाब ठरणार आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा