Breaking


कुलगुरू वरखडी यांची राजे विश्वेश्वरराव महाविद्यालयाला भेटभामरागड : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू श्रीनिवास वरखडी यांनी नुकतीच राजे विश्वेश्वरराव कला, वाणिज्य महाविद्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान कुलगुरू वरखडी यांनी महाविद्यालयातर्फे चालविण्यात येणारे विविध अभ्यासक्रम व उपक्रमांची माहिती घेतली. दुर्गम भागातील या महाविद्यालयाच्यावतीने भविष्यात विद्यार्थ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमाविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमराज लाड यांच्याशी त्यांनी चर्चा केली.


तसेच जुई या दुर्गम गावात महाविद्यालयाच्या वतीने आयोजित पूर्वनियोजित अभ्यास दौऱ्यातही कुलगुरू वरखडी यांनी सहभाग घेतला. या दरम्यान गावातील विद्यार्थ्यांशी, नागरिकांशी विविध विषयावर चर्चा केली. गावकऱ्यांनी पारंपारिक नृत्याच्या माध्यमातून कुलगुरूंचे स्वागत केले. यावेळी डॉ.संतोष डाखरे, डॉ. कैलास निखाडे, डॉ.प्रमोद घोनमोडे, डॉ.सुरेश डोहणे, प्रा. सी. एम.चालूरकर, रुपलाल गोंगले, प्रशांत आगलावे, सुनिल ताजणे, बंडू बोंडे, विवेक येरगुडे, बादल लोखंडे उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा