Breakingवडवणी : अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी


वडवणी / अशोक शेरकर : अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने वडवणी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


मागील २७ - २८ तारखेला झालेल्या गुलाब चक्रीवादळच्या तडाख्यात वडवणी तालुक्यातील  सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टीसह पुराने अक्षरशः थैमान घातले. यामुळे संपूर्ण पीकांचे तर नुकसान झालेच; पण काही ठिकाणी संपूर्ण शेतच वाहून जावून नदीत परावर्तित झाले, काही ठिकाणी खरडून गेले, विहीरी बुजल्या, पाईपलाईन, विद्युत मोटर, जनावरे वाहून गेली. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीची एन.डी.आर.एफ. मदतीच्या निकषाने पूर्तता होणे शक्य नाही. म्हणून वस्तुनिष्ठ नुकसानीची दखल घेऊन शासनाने भरीव मदत करावी. याशिवाय पीक नुकसानी संदर्भात पीक विम्यासाठी १७ऑगस्ट २०२० रोजी केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आधारे यावर्षीच्या सर्व पीकांचा विमा मंजूर करून तातडीने वाटप करावा. व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीकांची भरपाई म्हणून शासनाने प्रती हेक्टर ५० पन्नास हजार रुपये मदत द्यावी.झालेल्या नुकसानिच्या पार्श्वभूमीवर  सन २०२० च्या पीक विम्याचे तात्काळ वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.वडवणी तालुक्याची २०२१ - २२ वर्षाची आणेवारी ही झालेल्या नुकसाना प्रमाणे द्यावी.

उ.प्र. मधील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या खुन्नीवर ताबडतोब तोफ कारवाई करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.


सरकारने मागण्या लवकर सोडाव्यात, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


निवेदन देतेवेळी ओम पुरी, अतुल झाटे, गणेश अंबुरे, सुमंत गोंडे, दत्तात्रय कोल्हे, सावळाराम उबाळे, रामप्रसाद अंबुरे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा