Breakingआम्हाला वाटल, पटल तेच करू द्या; अकोले ग्रामसेवक मनमानी - डॉ. कुंडलिक केदारी यांचा आरोप


शासकीय निधी विनियोग सूत्र गेलं चुलीत ?


अकोले : आम्हाला वाटल, पटल तेच करू द्या; अशा प्रकारे अकोले ग्रामसेवकांची मनमानी सुरु असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. कुंडलिक केदारी यांनी केला आहे.

डॉ. केदारी म्हणाले, अपिलार्थी म्हणून मी तर जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक म्हणून  वार्घुशी, तेरुगन, तळे कोथले, कोहंडी, कोहणे आणि अंबीत हे हजर होते. विषय होता की डिसेंबर २०२० ते ३१मार्च २०२१  या कालावधीत ग्रामसभा सक्षम करणे, पेसा वनहक्क जनजागृतीसाठी किती खर्च केला ?  यासाठी दृकश्राव्य माध्यमातून जनजागृती साठीचे प्रस्ताव आले होते काय ? त्याचे  आयोजन केले किंवा कसे ?  पुढील आराखड्यात तरतूद केली किंवा कसे ? या प्रश्नाची उत्तरे आणली काय ? असे सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी मागणी केली. यावर ग्रामसेवकांनी हस्तलिखित उत्तरे सादर केली. लिखित उत्तरातून सर्वांनी एकमेकांची कॉपी केली असल्याचे केदारी याचे म्हणणे आहे.

ग्रामसभा सक्षम करणे, पेसा वनहक्क जनजागृती करणे याबाबत सर्वांचे उत्तर 'निरंक' होते. याचं प्रश्नच उतर माहिती अधिकारात   जनजागृती प्रस्ताव आले होते. जनजागृतीचे  खर्च केले नाहीत, असे उत्तर पळसुंदे, करंडी आणि टीटवी यांनी दिले आहे.

२१ एप्रिल २०२१ च्या पेसा निधी विनियोग सूत्राला चुलीत घातले जात आहे. या निधीकडे लक्ष न दिल्यास पैशाचा गैरवापर होईल, असेही डॉ. केदारी म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा