Breakingपुणे : खेड सेझ १५ टक्के परतावा धारक शेतकरी बैठक संपन्न, अन्यथा मुख्यमंत्री दालनासमोर आंदोलनाचा इशारा


पुणे : खेड सेझ १५ टक्के परतावा धारक  निवडक शेतकरी प्रतिनिधींची परतावा प्रश्नासंदर्भात आढावा बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव हरेश देखणे यांच्या अध्यक्षतेखाली शिरोली ता. खेड जि .पुणे येथील कृष्णपिंगाक्ष कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाली.


या बैठकीत खेड सेझ 15 टक्के परतावा प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात आली. व एकंदरीत आढावा घेण्यात आला.

सेझ बाधित १५ टक्के परतावा धारक बाधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हरेश देखणे म्हणाले "मुख्यमंत्री, उद्योग मंत्री, व संबंधित शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार करून देखील आपल्या मागणीप्रमाणे संयुक्त मिटींगचे आयोजन होत नसेल तर मुख्यमंत्री कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करावेच लागेल.  व त्यासाठी आपण एम.आय.डी.सी. प्रादेशिक अधिकारी यांना पुनश्च एकदा पत्रव्यवहार करून त्यांना संधी देऊयात व त्यातूनही जर संयुक्त बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली नाही. तर आंदोलनाच्या संदर्भात पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री दालना समोर आंदोलनाची तयारी करू!"

या बैठकीस शेतकरी प्रतिनिधींच्या वतीने काशिनाथ हजारे, विश्वास कदम, गणेश कांन्हूरकर, ऋषिकेश बेल्हेकर, मारुतराव गोरडे, प्रतीक कान्हूरकर, रविंद्र म्हसाडे, प्रभाकर जाधव, संजय सावंत, हे उपस्थित होते.
   
बैठकीचे नियोजन प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, भानुदास नेटके, ऋषिकेश चव्हाण व इतर सहकाऱ्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा