Breaking


भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून कॉ. अमर शेख यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन


बार्शी, ता.२० : भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कौन्सीलच्या वतीने कॉ. अमर शेख यांच्या जयंती निमित्ताने आज (दि.२०) रोजी कोर्टा समोरील पुतळा पार्क येथील अमर शेख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अमर शेखांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.  सोबतच शेतकरी, कामगार वर्गासाठी पुढील काळामध्ये अमर शेखांनी आयुष्यभर जपलेल्या मार्क्सवादी विचारधारेवर चिकाटीने काम करण्याचा निश्चय करण्यात आला.


यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रवीण मस्तूद, कॉ. शौकत शेख, कॉ. अनिरुद्ध नखाते, कॉ. भारत भोसले, कॉ. पवन आहिरे, कॉ. बालाजी शितोळे, कॉ. आनंद धोत्रे, कॉ. कलावती घोळवे, कॉ. निर्मला सरवदे उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा