Breaking


आदिवासी मुला मुलींचे शासकीय वसतिगृह ऑनलाइन प्रवेश सुरू, असा करा अर्ज, ही कागदपत्रे आवश्यक !


पुणे : आदिवासी मुला मुलींचे शासकीय वसतिगृह ऑनलाइन प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष 2021- 2022 करीता https://swayam.mahaonline.gov.in ही Website/संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.


■ आवश्यक कागदपत्रे : 

१. आधार कार्ड 
२. जातीचा दाखला किंवा जात पडताळणी सर्टिफिकेट 
३. बँक चे पासबुक 
४. कॉलेज चे बोनाफाईड सर्टिफिकेट
५. शासकीय दवाखान्याचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट 
६. उत्पन्नाचा दाखला  
७. मागील वर्षीचे मार्कशीट 
८. दहावीचे मार्कशीट 
९. शाळा सोडल्याचा दाखला

■ समस्या असल्यास संपर्क साधा !

गरजू आदिवासी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
काही समस्या जसे : कॉलेजचे नाव, कोर्स, शाखा जोडणे, उपलब्ध न होणे इ. समस्या आल्यास वेबसाईटवर हेल्पलाईन इमेल वर आपली अडचण स्पष्ट मोजक्या शब्दांत इ मेल करावी. किंवा संबंधित प्रकल्प अधिकारी कार्यालयास संपर्क करावा.

■ लक्षात ठेवा : एका मोबाईल नंबर चा वापर केवळ एकदाच एक लाभार्थ्यास करता येतो. एका कुटुंबात  एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर प्रत्येक ऑनलाइन अर्जाकरिता स्वतंत्र मोबाईल नंबर वापरणे बंधनकारक आहे. आधार अपडेट असू द्या.बँक खाते स्वतःचे नावेच काढावे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सद्याचे असावेत.

1 टिप्पणी: