Breaking


अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग, १० रुग्णांचा होरपळून मृत्यू


अहमदनगर, ता.६ : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागली आहे. रुग्णालयातील आयसीयू मध्ये ही आग लागली असून १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.


मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० च्या सुमारास अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डात आग लागली, त्यावेळी एकूण २० रुग्ण उपचार घेत होते. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले, या भीषण आगीत १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात इतरही काही जण जखमी झाले आहे. यासोबतच रुग्णालयातील नर्सेस, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे.

 


तसेच, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत.


दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही. आयसीयू वॉर्डात लागलेल्या या आगीने अवघ्या काही वेळातच संपूर्ण वॉर्डला आपल्या विळख्यात घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा