Breaking


आंबेगाव : ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या तालुका शाखेचे उद्धाटन


घोडेगाव : ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन घोडेगाव तालुका शाखेचे जल्लोषात उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, धरती आबा जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.


ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन कर्मचारी संघटना उद्घाटन समारंभ वनमाला मंगल कार्यालय घोडेगाव येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन पुणे जिल्हा अध्यक्ष सखाराम गवारी हे होते.

या कार्यक्रमासाठी जिल्हा सचिव संतोष असवले, उपाध्याक्षा सुरेखा झांजरे, जिल्हा संघटक पांडुरंग लांडे त्याचबरोबर लक्ष्मण घोटकर, केंद्रीय सदस्य किरण ठोंगरे पुणे विभागीय अध्यक्ष तसेच आंबेगाव तालुका तहसिल विभागातील नायब तहसीलदार अनंता गवारी तसेच आंबेगाव तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश वडेकर, सचिव शंकर गाडेकर सर्व कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ मार्गदर्शक गाडेकर गुरुजी वरील सर्व मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणामध्ये सखाराम गवारी म्हणाले, संघटनेचे महत्त्व आदिवासी एकजूट दाखवावी व शासकीय निमशासकीय खासगी व हंगामी सेवकांचे प्रश्न कसे सुटतील यासाठी संघटना कायम सेवकांनाच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहिल. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिम बेंढारे यांनी केले, तर आभार तालुका सचिव शंकर गाडेकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा