Breaking


ओमनगर राजूर येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे आणि धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती साजरी !


कोले / कैलास पडवळे : ओमनगर राजूर या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव व भगिनी यांनी एकत्र येऊन आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती  साजरी करण्यात आली. 


यावेळी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सिताराम धांडे यांनी केले. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास व आदिवासी संस्कृती जतन व संवर्धन या विषयांवर चर्चा करण्यात आली. 

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जन्म देवगाव येथे झाला त्यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या सर्व जनतेसाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन न्याय मिळवून दिला. आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना राजूर येथे अभिवादन करण्यात आले.

यावेळी सखाराम सुकटे, डॉ. सुपे, संतोष कोंडार आदीसह उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा