Breaking
पुणे विद्यापीठाचे 'उंबरठा' नियतकालिकास पारितोषिकसुरगाणा (दौलत चौधरी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ यांचा पारितोषिक प्रदान व गौरव समारंभ-२०२१ नुकताच संत नामदेव सभागृह येथे पार पडला. 


विद्यार्थी विकास मंडळ यांच्यावतीने दरवर्षी महाविद्यालयीन नियतकालिके स्पर्धा घेतल्या जातात. ह्या स्पर्धेत प्रत्येक महाविद्यालयाचे दरवर्षी प्रकाशित होणारे नियतकालिके सहभाग नोंदवता. यातील वैशिष्ट्येपूर्ण नियतकालिक अंकास विद्यापीठ व विभागीय स्तरीय पारितोषिक प्रदान करून गौरव केला जातो.


डांग सेवा मंडळ नासिक संचलित, कला व वाणिज्य महाविद्यालय उंबरठाण या महाविद्यालयाने सन २०१७-१८ मध्ये प्रकाशित केलेला ‘उंबरठा’ ह्या नियतकालिक अंकास नाशिक विभागीय स्तरावर तृतीय पारितोषिक प्रदान करून गौरव केला. तसेच, सन २०१८-१९ मध्ये महाविद्यालयाने प्रकाशित केलेला ‘उंबरठा’ नियतकालिक अंकास विद्यापीठ स्तरावरील चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले. या दोन्ही वर्षाचे पारितोषिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.नितीन करमळकर, प्र.कुलगुरू प्रा.डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल पवार, विद्यार्थी विकास मंडळ योजना व उपक्रम समन्वय समिती अध्यक्ष राजेश पांडे, अधिष्ठाता डॉ. अशोक चास्कर, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा.डॉ.संतोष परचुरे, आदी. मान्यवरांच्या हस्ते व पुणे, नगर, नाशिक येथील महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांच्या विशेष उपस्थितीत उंबरठाण महाविद्यालयाच्या दोन्ही  नियतकलिक अंकास पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले.


डांगचा प्रदेश म्हटला की, घनदाट जंगलांनी व्यापलेला हा प्रदेश, ह्या प्रदेशात दिवसा ढवळ्या ही हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो. अशातच निसर्गाला सर्वस्व मानून, निसर्गावर निष्ठा ठेवून, आदिम काळापासून डोंगरदरांच्या कडेकपरित आपली गुजराण करणारा हा आदिवासी बांधव. स्वच्छंद व स्वतंत्रपणे निसर्गात बागडणाऱ्या या डांग परिसरातील आदिवासी बांधवांसाठी शिक्षणाची दारे पहिल्यांदा डांग सेवा मंडळाने खुली केलीत म्हणून आदिवासी बांधवांची मुले जंगलाची वाट तुडवीत कधी पायी तर कधी मिळेल त्या वाहनामध्ये बसून येतात, महाविद्यालयामध्ये शिकणारे सर्वच विद्यार्थी हे आदिवासी आहेत. आज डिजिटल क्रांतीच्या युगात मात्र आदिवासी संस्कृती गडप होताना दिसत आहे. ‘आदिवासींच्या संस्कृतीतील रूढी, परंपरा व गौरवशाही आदिवासी संस्कृतीतील लोकसाहित्याचा अनमोल ठेवा कायमस्वरुपी टिकून राहावा व येणाऱ्या पिढीसाठी तो संचित करून ठेवावा. या उद्दात्त हेतूने महाविद्यालयाने ‘उंबरठा-आदिवासी लोकसाहित्य विशेषांक (२०१८-१९)’ नियकालिक अंक प्रकाशित केला. महाविद्यालयाच्या या सामाजिक उपक्रमाची दखल विद्यापीठाने घेतल्यामुळे ‘उंबरठा-आदिवासी लोकसाहित्य विशेषांक (२०१८-१९)’ नियतकालिक अंकास विद्यापीठ स्तरीय चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले.


या दोन्ही नियकालिक अंक प्रकाशनासाठी डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, संस्थेच्या सचिव मृणाल जोशी यांचे प्रेरणादायी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. तसेच, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. जी. डी. रूपवते, ए. एस. फापाळे, नियतकालिक समितीचे अध्यक्ष प्रा. एकनाथ आहेर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सुभाष पवार, प्रा. किशोर काळे, प्रा. मधुकर गावित, प्रा. उमाताई देशमुख, प्रा. कलावती थविल, प्रा. हेमलता महाले, प्रा. अनिता कोळी, अनिल कदम, महेंद्र पगार, हिरामण गावित, त्याचबरोबर या नियकालिक अंकासाठी विशेष योगदान देणारे महाविद्यालयीन विद्यार्थी रवींद्र दळवी, राधेश पवार, निलेश डगळे, पुंडलिक चौधरी, सोनाली अलबाड, कल्पना देशमुख, मीनाक्षी चौधरी, ललिता चौधरी, सारा पवार इ. यांचे सहकार्य मिळाले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा