Breaking

बारामती : कृषी दुतांची श्रमण फुड्स बारामती येथे भेट !


बारामती : बारामती येथील श्रमन फूड्स या अन्न प्रक्रिया उद्योगाला कृषी महाविदयालयातील विद्यार्थ्यांनी भेट दिली.


कृषी पदवी अभ्यासक्रम अंतर्गत अंतिम वर्षात सदर विद्यार्थ्यांना एका कृषी पूरक व्यवसायास भेट देऊन तिचे कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक असते. त्या निमित्ताने विविध कृषी महाविद्यालय मालेगाव, कृषी महाविद्यालय सोनई, कृषी महाविद्यालय नाशिक, कृषी महाविद्यालय कोल्हापूर या महाविद्यालया मधील 6 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

फळे आणि भाजीपाला निर्जलीकरण म्हणजेच dehydration व्यवसाय हा येत्या काळात कृषी क्षेत्राला नव संजीवनी देणारा ठरणार आहे. याद्वारे पदार्थातील पाणी काढून त्याची गुणवत्ता जशीच्या तशी ठेऊन एका वर्षापर्यंत वाढवली जाते. त्यामुळे सीझन ला मिळणारी फळे आपण वर्षभर खाऊ शकतो.

मार्केट मध्ये शेतमालाचे भाव स्थिर नसतात. जर एखादा शेतमालाचे भाव पडले की शेतकरी वर्गाचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होते. ते टाळण्यासाठी शेताच्या बांधावर प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळता येते व शेतमालाचा ब्रँड विकसित केल्यावर मूल्यवर्धित उत्पादने बाजारात विकता येतात. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होते असे प्रतिपादन श्रमन फुडस चे उद्योजक रत्नदिप सरोदे यांनी केले.

कृषी पदवीधर विद्यार्थ्यांनी जर कृषी प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली तर ग्रामीण भागातील विकासचक्र अधिक गतिमान होईल असे श्रमन फूडस चे उद्योजक रोहन थोरात म्हणाले.

या उपक्रमात राजू लवटे, ओंकार सरगर, किरण गायकवाड, गोरख आदलींग, अजित आदलिंग, आशिष नलावडे आशिष, राजरत्न सरोदे, सोमनाथ जाधव हे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा