Breaking


Big breaking : नवे तीन कृषी कायदे रद्द होणार, शेतकरी आंदोलनाचा ऐतिहासिक विजय


नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुनानक जयंतीच्या निमीत्ताने केली.नवे कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने गेल्या एक वर्षापासून राजधानी दिल्लीच्या सिमांवर शांततेमय मार्गाने आंदोलन सुरू आहे. ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा या आंदोलना दरम्यान मृत्यू झाला आहे.

नरेंद्र मोदींनी केलेली ही घोषणा येऊ घातलेल्या उत्तरप्रदेश निवडणूकांमुळे तर नाही ना अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु या निर्णयानंतर शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा