Breaking


ब्रेकिंग : पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी घट, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णयनवी दिल्ली, ता.४ : दिवाळीच्या तोंडावर देशभरात महागाईचा भडका उडाला आहे, सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. सलग ७ दिवस पेट्रोलच्या दरात तर डिझेलच्या दरात सहा दिवस ३५-३५ पैशांची वाढ करण्यात आली होती. आता दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.


देशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर १२० रूपये, तर डिझेलचे दर १०० रूपयांच्या पुढे गेले होते. केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने आता पेट्रोलचे दर ५ रूपयांनी आणि डिझेलचे दर १० रूपयांनी कमी होणार आहेत.


हे नवे दर आज (गुरूवार) पासून लागू होणार आहेत. महागाईनं त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना सरकारच्या या निर्णयामुळे काहीशा प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दरम्यान, केंद्रानं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील वॅट कमी करावा असं आवाहन अर्थ मंत्रालयाद्वारे करण्यात आलं आहे.


आज दिल्लीमध्ये प्रति लिटर पेट्रोलची किंमत १०३.९७ आहे तर डिझेल ८६.६७ झाली आहे, मुंबई मध्ये पेट्रोल १०९.९८ तर डिझेल ९४.१४ आहे, कोलकाता मध्ये पेट्रोल १०४.६७ आणि डिझेल ८९.७९ लीटर आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा