Breaking


ब्रेकिंग : पतसंस्थेवर भरदिवसा शस्त्र दरोडा, १ चा खून


जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर आज ( दिनांक 24 नोव्हेंबर ) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन दरोडेखोरांनी शस्त्र हातात घेऊन दरोडा टाकला. या दरोड्यात दोन लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. 

यावेळी बँकेत व्यवस्थापक दशरथ भोर आणि महिला कर्मचारी हजर होते. दरम्यान दोन दरोडेखोर हातात पिस्तुल घेऊन धमकावत असताना व्यवस्थापक दशरथ भोर यांनी विरोध केला असता त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली. यामध्ये बँकेचे व्यवस्थापक दशरथ भोर यांचा जागीच मृत्यु झाला. 

नारायणगाव आणि आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन दरोडेखोरांचा शोध सुरु आहे. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा