Breaking


दिवाळी साजरी न करता, गावपातळीवर संयुक्त जंयती साजरी !


क्रांतीकारकांच्या शौर्याला उजाळा व विनम्र आभिवादन !


राजूर : अहमदनगर जिल्हातील आदिवासी दुर्गम अकोले तालुक्यातील राजूर जवळील मौजे चिंचावणे या गावी सर्व तरूणांनी एकत्र येत दिवाळी साजरी न करता, गावपातळीवर आल्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जंयती साजरी केली.

आद्यक्रांतीकारकांच्या शौर्याला उजाळ देवून  नवे बंड पुकारण्यात आले आहे. सर्वांनी एकत्र येऊन ठरवले तर गावचा सार्वांगिण विकास होऊ शकतो, असेही समाजसेविका डॉली गणेश डगळे म्हणाल्या.

प्रमुख मार्गदर्शक तळपाडे,.शेंगाळ, विजय पवार, ग्रामसेवक भांगरे सह गावचे जेष्ठ मार्गदर्शक लहानू डगळे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भगवान चावडे यांनी केले तर श्रीराम सांऊड सिस्टीम चिंचावणे यांच्या वतीने मोलाचे सहकार्य लाभले व युवा परिवर्तन ग्रामविकास मंडळ चे सदस्य तथा ग्रामपंचायत कमिटी सह, ग्रामविकास प्रतिष्ठान, के.ए.ग्रुप, वेताळेश्वर मित्र मंडळ यांनी उपस्थिती दाखवली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा