Breaking


ई प्रभाग सभापती पदी निवड झाल्याने सत्कार समारंभ


दिघी
 : दिघी गावचे कार्यक्षम नगरसेवक विकास डोळस यांची दुसऱ्यांदा ई प्रभाग पदी निवड झाल्याने दिघी विकास मंचाच्या वतीने ई प्रभाग सभागृहामध्ये त्यांचा शाल श्रीफऴ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी दिघी विकास मंचचे मुख्य सल्लागार सुनिल काकडे, मार्गदर्शक के.के.जगताप पांडुरंग मेहत्रे, खजिनदार दत्ता घुले, रज्जाक पठाण, कुंडलिक आदक, दिव्या शिक्षण संस्थेचे संचालक इंद्रजीत भोसले, कुंडलिक आदक, सतीश खरात, मराठवाडा विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश इंगौले, धनाजी कोंडजे, संदीप पंडीत, जयराम लिमशे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पांडुरंग म्हेत्रे यांनी केले.

सामाजिक कार्यकर्ते रमेश विरनक, बाळासाहेब सुपे, सलीम शेख, कुमार लोमटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेक वक्त्यांनी नगरसेवक विकास डोळस यांच्या प्रभागातील कार्याचे खुप खुप कौतुक केले तसेच पुढील भावी वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. यावेळी उपस्थीतांचे आभार हॅप्पी इंग्लिश स्कुलचे जगताप यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा