Breaking


चाकण : युनिथर्म इंजिनिअर्स प्रा. लि. वेतनवाढ करार, किमान वेतन झाले ३५ हजार रुपये



चाकण : चाकण औद्योगिक वसाहती मधील खराबवाडी येथील युनिथर्म इंजिनिअर्स प्रा. लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार झाला आहे.

 

करारामध्ये झालेले ठळक मुद्दे :

- ८००० (आठ हजार एक) रुपये प्रत्यक्ष (नेट) पगार वाढ ही पहिल्या वर्षीच १००% लागू,

- कराराचा कालावधी ०१/०४/२०२० ते ३१/०३/२०२३ या तीन वर्षांचा राहील,

- मेडिक्लेम पॉलिसी १,००,०००/- रुपये संपूर्ण खर्च कंपनी करणार, व जादाची ५,००,०००/- रुपयांची बफर पॉलिसी,


- मृत्यू साहाय्य योजना :

अ) मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार आणि तेवढीच रक्कम कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.

ब) एखाद्या कामगाराचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास युनियांशी चर्चा करून त्यास मदतनिधी व योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल,

- वर्कमेन कॉम्पेन्सेशन पॉलिसी नव्याने चालू,


- सूटया :

A) PL - १८ दिवसाला १ राजा या प्रमाणे PL मिळतील,

B) आजारपण रजा- ०७

C) किरकोळ रजा - ०६ 

D) शासकीय रजा - ८

E) मतदानाची सुट्टी सरकारी आदेशानुसार राहील,

F) शॉर्ट लिव्ह - दोन वेळा देण्याचे मान्य,


- दिवाळी बोनस :

एक महिन्याचा एक ग्रॉस पगार वार्षिक बोनस म्हणून देण्यात येईल, व एक भेट वस्तू देण्यात येईल, 


- मासिक हजेरी बक्षीस :

A) २६ - दिवसाला  ७५०/- रुपये,

B) २४ - दिवसाला ५००/- रुपये,

C) २२ - दिवसाला ३००/- रुपये,

अपघात झाल्यामुळे रजा झाल्यास हजेरी बक्षीस मिळणार


- वार्षिक सहल :

- सर्व कामगारांसाठी वर्षातून एकदा तीनशे किलोमीटर अंतरापर्यंतची सहल दोन दिवस व एक रात्र ठरविण्यात आली


- बक्षीस योजना :

कामगारांच्या मुला मुलींसाठी त्यांची गुणवत्ता पाहून बक्षीस देण्याचे मान्य

- प्रत्येक कामगाराला प्रत्येकी १८ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे.


करारावरती संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, खजिनदार अमृत चौधरी, संघटक रघुनाथ मोरे, तेजश बीरदवडे, प्रशांत पाडेकर, यूनिट अध्यक्ष संतोष केळकर, उपाध्यक्ष संदीप दरवडे, सरचिटणीस आनंद शिंगणकर, खजिनदार राहूल वाघमारे, व्यस्थापनाच्या वतीने सी.इ.ओ. मनीष खंडेलवाल, सी एफ ओ.अमितकुमार झा, जनरल मॅनेजर अभिषेक शर्मा, एचआर हेड सुदर्शन सी., एच आर मॅनेजर अमित पवार यांनी सह्या केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा