Breaking


केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध चांदवडला युवा सेनेचे आंदोलनचांदवड, ता.३१ (सुनिल सोनवणे) : गॅस, पेट्रोल, डिझेल यांची दरवाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्य माणसांचे जीवन जगणे मुश्किल केले आहे व हेच का अच्छे दिन? त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व युवा सेनेचे वरूण सरदेसाई यांच्या आदेशानुसार चांदवड येथे युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत देवरे व तालुका अध्यक्ष रोहित ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली सायकल रॅली व गॅस सिलेंडरची मिरवणूक रॅली चांदवड तालुका शिवसेनेच्या कार्यालयापासून काढण्यात आली.


पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडर यांच्या भयंकर दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली असताना सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. सर्वसामान्य जनता, बेरोजगार, मजूर व हातावर पोट भरणारे व्यक्तींचे जनजीवन जगणे मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.


पेट्रोल व डिझेल यांनी तर शंभरी पार केली आहे तर गॅस सिलेंडर हजार रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. पेट्रोल गॅस सिलेंडर व डिझेलचे भाववाढ केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध युवासेनेने एल्गार पुकारला आहे. त्वरित डिझेल पेट्रोल गॅस सिलेंडर यांची दरवाढ कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.


या रॅलीत चांदवड शिवसेना शहर प्रमुख संदीप उगले, उपशहर प्रमुख सचिन खैरनार, शहर संघटक प्रसाद प्रजापत, अॅड. विनायक हांडगे, मुकेश कोतवाल, शंभू खैरे, अकबर पठाण, महिला जिल्हाध्यक्ष भारती जाधव, रोहिणी वाघ, ममता बागुल, शहराध्यक्ष अपर्णा अहिरे तसेच युवा सेनेचे घमाजीराजे सोनवणे, सुरज भोसले, जालिंदर दिवटे, माणिक ठाकरे, प्रकाश चव्हाण, मनोज सूर्यवंशी यांचेसह शिवसेना युवासेना व महिला शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा