Breakingपरदेशातून आलेल्या नागरिकांनी संपर्क करा – आयुक्त राजेश पाटीलपिंपरी चिंचवड : आफ्रिका आणि युरोपीय देशामध्ये "ओमोक्रोन" या कोरोनाच्या विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने खबरदारीच्या आणि आवश्यक व  योग्य पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.


पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी शहरात मागील १५ दिवसांमध्ये परदेशातुन शहरात आलेल्या नागरिकांनी मनपाच्या सारथी हेल्पलाईनवर (८८८८००६६६६) संपर्क करून आपली माहिती कळवावी. मनपा त्या नागरिकांची आवश्यकतेनुसार आर टी पी सी आर करेल. असे आवाहन केले आहे.


पॉझिटिव्ह असलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवून उपचार करण्यात येतील, आणि सान्निध्यात असलेल्या रुग्णांना गृहविलगिक रण कक्षात राहण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा