Breaking


DYFI चा 41 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा !


पेट्रोल, डिझेल, घरगुती व व्यावसायिक इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात एक व्हा ! 


सोलापूर : 3 नोव्हेंबर हा दिवस डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया  डी.वाय.एफ.आय. चा वर्धापन दिन. भारतातील अडीच कोटी सदस्य संख्या असणारी सर्वात मोठी युवकांची संघटना आहे. तब्बल 40 वर्षापासून सर्वांना शिक्षण, सर्वांना काम मिळाले पाहिजे.स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आली पाहिजे. यासाठी कायम संघर्षाच्या पवित्र्यात असणारी युवकांची  संघटना आहे. आज भारतात सर्वांत जास्त युवक बेरोजगारी ची समस्या आहे. तसेच केंद्र सरकार दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, घरगुती व व्यावसायिक इंधन दरवाढ व महागाई च्या विरोधात एक व्हा असा निर्धार  संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. 

बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी ता.दक्षिण सोलापूर कुंभारी येथील गोदूताई नगर येथे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली डी.वाय.एफ.आय.चा 41 वा वर्धापनदिन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला यांच्या हस्ते शहीद भगत सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. 

यावेळी जिल्हा सचिव अनिल वासम यांनी केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात टीका करताना म्हणाले की, भारत देश युवकांचा बलाढ्य देश आहे, असे देशाचे पंतप्रधान मोदी 56 इंच छाती फुगवून सांगतात पण ते बलाढ्य तरुण बेरोजगार आहेत हे ही सांगा. तरुणांना उध्वस्त करू पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात डी.वाय.एफ.आय.रस्त्यावरची लढाई करत राहील.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सहसचिव दत्ता चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन तालुका सचिव विजय हरसुरे यांनी मानले. 

यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब मल्याळ, नरेश गुल्लापल्ली, मधुकर चिल्लाळ, नवनित अंकम, नितीन माकम, जुबेर शेख, दशरथ गंजी, मनोहर संगा आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा