Breaking


सुरगाणा पंचायत समिती कार्यालयावर DYFI दणका मोर्चा..!


नाशिक / पंडित भोंगे : सुरगाणा तालुक्यातील 'ड' घरकूल योजनेपासून वंचित राहिलेल्या आणि घरकूल अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभधारकांना हक्काचे घरकूल मिळावे यासाठी तालुक्यातील 10 हजार घरकूल लाभधारक युवक, नागरीकांचि मोर्चा काढण्यात आला. 


DYFI संघटनेचे राज्य अध्यक्ष साथी सुनील धानवा यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुका अध्यक्ष सुभाष भोये, तालुका सेक्रेटरी साथी पांडुरंग गायकवाड, जिल्हा कमिटी सदस्य रोहिणी वाघेरे, मेनका पवार आणि DYFI तालुका कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला होता. 

सुरगाणा शहरात रॅली काढून घरकूल सरसकट मिळावे यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तालुक्यातील अपात्र ठरवलेल्या आणि वंचीत राहिलेल्या जवळपास दहा हजार घरकूल लाभधारकांनी मोर्चात सहभागी झाले. घरकूल अपात्र ठरविनाऱ्या 17 जाचक अटी नियमांना हद्दपार करा, हक्काचे घर विनाअट लाभार्थ्याला द्या, स्वतंत्र कुटुंब झाल्याने तालुक्यातील गरीब जनतेसाठी स्वतःचे घर अत्यावश्यक आहे, याबाबत शासनाने गरजूंना न्याय द्यावा, महागाईच्या काळात 1,50,000  ऐवजी 3,00,000 रूपये घरकुला साठी द्यावेत.

तालुक्यातील आदिवासीं जनतेचा वनजमिनीचा हक्क स्वतंत्र सातबारा मिळावा, रेशन कार्ड, रेशन धान्य, मिळावे, तालुका स्तरावर आरोग्य सुविधा चांगली असावी,  तालुका स्तरावर योग्य उपचार न करता गरीब शेतकरी नागरिकांना योग्य सुविधा नसल्याने उपचारासाठी शहराकडे पाठविले जाते, शेतकऱ्यांच्या विरोधी तीन काळे कायदे केले आहेत ते त्वरित रद्द करावेत, तालुक्यातील युवती, युवकांना रोजगार मिळावा, नोकरी मिळावी. महिलांसाठी अरोग्य आणि सुरक्षिकता असावी, कोविड काळात ग्रामीण भागात जी शिक्षणाची मोठी नुकसान झाली ती भरून काढावी. असे आग्रही आवाहन सर्व DYFI संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले.

येणाऱ्या काळात घरकूल योजना आणि हक्काचे ३,००,००० लाखाचे  घर दिले नाही, जाचक अटी रद्द केल्या नाहित तर येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनावर  दणका मोर्चा काढण्यात येईल, त्याठिकाणी आम्हाला आम्हाला न्याय मिळाला नाही तर मुबई . राज्य आणि दिल्ली केंद्र सरकार यांच्यावर संघर्षपुर्ण मोर्चा काढू असे आवाहन केले. यावेळी हजारो मोर्चेकरी बांधवांनी हात वर करून दिल्लीपर्यंत संघर्ष करू अशी जिद्द दाखविली.

सर्व मागण्याचा पाठपुरावा लवकरात लवकर करू, महत्वाचा प्रश्न आहे तो त्वरित निकाली लावण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करू अशे आश्वासन उपस्थीत सर्व मोर्चेकरी बंधवांसमोर देण्यात आली. यावेळी अपात्र केलेली घरकुले, या योजनेपासून वंचित राहिलेले लाभधारक यांनात्वरित पुरवणी यादीत समाविष्ट करून सर्वांना लवकरात लवकर घरकूल पुरवणी यादीत समाविष्ट करु, असे अधिकारी वर्गाने आश्वासने दिली.

यावेळी DYFI राज्य अध्यक्ष सुनील धानवा , तालुका अध्यक्ष सुभाष भोये, तालुका सेक्रेटरी पांडुरंग गायकवाड, पेठ तालुका उपसभापती महेश टोपले साहेब, तसेच DYFI तालुका कमिटी सदस्य, गाव पातळीवरील DYFI सदस्य उपस्थीत होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा