Breaking


आदिवासींना स्वतंत्र धर्म कोड जाहीर करा - बिरसा फायटर्स


तळोदा
 : आदिवासींना स्वतंत्र धर्मकोड देण्यात यावे यासाठी तळोदा तहसीलदार यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांना बिरसा फायटर्सने निवेदन पाठवून मागणी केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, मुळात: आदिवासी हा कोणत्याही धर्माचा नाही. आदिवासींची संस्कृती ही इतर धर्मापासून भिन्न आहे. १८७१ ते १९५१ पर्यत आदिवासींसाठी स्वतंत्र धर्मकोड होता. आदिवासींच्या जन्म-मृत्यूचा विधी, लग्नाच्या पूजाविधी, सण, रूढी-परंपरा, रीतिरिवाज, आचार-विचार व एकूणच आदिवासींची जीवन संस्कृती ही वेगळी आहे. आदिवासी हा निसर्गपूजक आहे.

देशातील काही संस्था आदिवासींना धर्मांतर करून आदिवासींचे अस्तित्व संपविण्यासाठी कटकारस्थान करीत आहे. जबरदस्तीने धर्म लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदिवासींच्या धर्माचा उल्लेखाविषयी अनेकदा निकाल दिला आहे. देशात १२ कोटी लोकसंख्या असलेल्या आदिवासींना येणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र'आदिवासी धर्मकोड देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

निवेदनावर बिरसा फायटर्स राज्य महासचिव राजेंद्र पाडवी, जिल्हा कार्याध्यक्ष भरत पावरा, लक्कडकोट शाखाध्यक्ष संतोष गावीत, शाखाध्यक्ष रोझवा पुनवर्सन बारक्या पावरा, देविसिंग वळवी, एकलव्य संघटनेचे गणपत पाडवी राजू प्रधान, चुनीलाल पाडवी, कांतीलाल पाडवी, कपिल गावीत, प्रताप पावरा, दिलीप पावरा, गुलाबसिंग वळवी, जयसिंग वळवी, कोचऱ्या पाडवी यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा