Breaking


फिरते कोवीड १९ लसीकरण व्हॅन चे लोकार्पण सभापती इंद्रजीत गावीत यांच्या हस्ते संपन्न


नाशिक : गुरुवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरगाणा पंचायत समिती येथे जिल्हा परिषद नाशिक आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते कोवीड १९ लसीकरण व्हॅन चे लोकार्पण पंचायत समिती सभापती इंद्रजीत गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.


सुरगाणा तालुक्यात कोरोणा लसीकरणाची टक्केवारी फक्त ५८ % झाल्यानं जिल्हा परिषद व स्वदेश फाउंडेशन यांनी खास बाब म्हणून सुरगाणा तालुक्यासाठी गावोगावी जाऊन फिरणार्या कोरोणा व्हॅनची उपलब्धता करून दिली आहे. जेणेकरुण कोरोणा लसीकरणापासुन एकही माणूस शिल्लक राहणार नाही. 

तरी लसीकरणापासुन शिल्लक राहिलेल्या नागरिकांनी फिरत्या लसीकरण व्हॅन द्वारे लसीकरण पुर्ण करुन घ्यावे, असे आवाहन सभापती इंद्रजीत गावीत, डॉ. रणवीर, स्वदेश फाउंडेशन उपसंचालक डॉ. नीता हरमलकर, गटविकास अधिकारी गायकवाड व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा