Breaking


शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या इफ्को टोकियो विमा कंपनीवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणीनांदेड : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्धवट पीकविमा देऊन शासन व प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्या व शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या इफ्को टोकियो विमा कंपनीवर तात्काळ ४२० चा गुन्हा दाखल करून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव परतावा मिळवून द्यावे या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत विस्तृत चर्चा करून निवेदन दिले.


यावेळी बालाजी जाधव ठाणेकर, बसवंत पाटील शेळगावकर, पत्रकार कृष्णा जोमेगावकर, बालाजी पारसेवार, अमोलकुमार वाघमारे, चंद्रकांत इंगळे इब्राहिमपूरकर हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा