Breaking


अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी


राजूर, ता.५ : अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील अवैध देशी दारू विक्री बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय पवार यांनी राजूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


पवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, रंधा धबधबा आई घोरपडाई तालुक्यातील आदिवासीचे दैवत असताना याच ठिकाणी रंधा फाटा येथील मराठी शाळेजवळ, तसेच वाकी बंगला शेजारीच मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे अनेक महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. शालेय, महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या मुलींना देखील छेडण्यात येते, पंरतु बदनामी व भिती पोटी कोणी तक्रार करायला पुढे येत नाही.

या दारू विक्रेत्यांकडून दारूबंदीवर आवाज उठवणाऱ्यांना धमकी मिळते, सर्वसामान्य महिला व नागरिक यांनी या दारू विक्रेत्या यांच्याकडे विचारणा केली असता, "आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही" असे उत्तर दिले जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय पवार यांचे म्हणणे आहे.

या संदर्भात आज राजूर पोलीस स्टेशनला लेखी स्वरुपात तक्रार अर्ज सादर करण्यात आला. तसेच पुढील आठ दिवसात कारवाई न झाल्यास तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, महिला कार्यकर्ता यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन समोर बसून आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा