Breaking


प्रा. धनंजय सोमनाथ भिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीरपुणे : प्रा.धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर झाली आहे. १९ जुलै रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. ही संशोधन पदवी जाहिर केली. त्याबाबतच्या खुल्या परीक्षेचे आयोजन विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये मराठी विभागप्रमुख डॉ.प्रभाकर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि बहि:स्थ परीक्षक डॉ.सतीश बडवे (औरंगाबाद) यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्याला ८२ हून अधिक व्यक्तींनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती. डॉ.भिसे यांनी पीएच.डी.साठी डॉ.बाबासाहेब शेंडगे (कोपरगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली 'इ.स. २००० ते २०१० मधील दलित आत्मकथने : एक शोध' ह्या शीर्षकाचा प्रबंध विद्यापीठाला सादर केलेला होता.


या खुल्या परिक्षेला माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी कुलगुरु एस.एन. पठाण, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर, प्राचार्य पांडुरंग गायकवाड, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ.मच्छिंद्र सकटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट मेंबर प्रा.डॉ.देवीदास वायदंडे, मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.तुकाराम रोंगटे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा