Breaking


सामाजिक कार्यकर्त्यांची वसतिगृह आणि गोशाळेला आर्थिक मदतदेहूगाव : देहूगाव येथील विश्वकल्याण मानव सेवा संस्थेला घरकुल, चिखली येथील शिवसेना शाखा प्रमुख किसन शेवते, गोविंद तांबवडे, उपशाखाप्रमुख बापू ढेकळे, दत्तात्रय शिंदे, शिवसैनिक दादाराव कचरे, गोरख पाटील यांनी रोख रक्कम पाच हजार रु. देणगी स्वरूपात दिली आहे.


देविदास महाराज धर्मशाळा विठ्ठलवाडी, देहूगावचे संचालक ह.भ.प. क्षिरसागर महाराज यांनी रोख रक्कम स्वीकारली. विश्वमानव संस्थेच्या वतीने गरीब मुलांचे वसतिगृह आणि गोशाळा चालवली जाते. कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी हा निधी देण्यात  आला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा