Breaking


भीषण अपघातात अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबातील पाच लोकांचा मृत्यूनवी दिल्ली, ता.१६ : सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबातील पाच जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. बिहारमधील लखीसराय येथे मंगळवारी सकाळी हा अपघात झाला, ज्यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला आणि या सातपैकी पाच जण सुशांतच्या जवळील असल्याची माहिती समोर येत आहे. या बातमीनंतर सुशांतच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

 


बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात मंगळवारी पहाटे झालेल्या एका रस्ते अपघातात सात जणांना आपला जीव गमवावा लागला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेले पाच लोक हे फिल्म स्टार सुशांत सिंग राजपूतचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांंच्यासह कार चालकाचाही मृत्यू झाला. 


मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत सिंग राजपूतचे कुटुंबीय पटनाहून परतत होते जिथे ते हरियाणाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ओपी सिंग यांची बहीण गीता देवी यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. ओपी सिंह हे सुशांत सिंह राजपूतचे मेहुणे आहेत. त्यावेळी हे वाहन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 333 वरून जात असताना एका ट्रकला धडकले. त्यानंतर कारमध्ये बसलेल्या सात जणांचा मृत्यू झाला.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा