Breaking


गडचिरोली : पोलीस आणि माओवाद्यांच्या चकमकीत २६ माओवादी ठारगडचिरोली, दि.१३ : गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात पोलिस आणि माओवाद्यांच्या चकमकीत २६ माओवादी ठार झाले आहे. ही कारवाई राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी असल्याचे मानले जात आहे.


ग्यारापत्तीच्या या भागात कँपनी -४ चे माओवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यावेळी पोलीस आणि माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. त्यात २० पुरुष तर ६ महिला नक्षली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. 


नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 


 नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.


दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी “आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत पोलिसांचे कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा