Breaking


रुग्णालयांमध्ये विविध आरोग्य योजना राबविण्यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून हिरवा कंदील


पुण्यातील प्रहार रुग्णसेवा समितीच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग !


मुंबई : महाराष्ट्रातील धर्मादायअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीसह कोणत्याही शासकीय आरोग्य योजनांचा लाभ गोरगरीब रुग्णांना मिळत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा रुग्णसेवकांनी आज यासंदर्भात थेट मंत्रालयावर धडक देत मुख्यमंत्री कार्यालयाकडे याविषयी तक्रार केली. त्याची दखल घेत सदर रुग्णालयांची माहिती घेऊ तसेच आरोग्य योजनांना भरीव निधी देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे.

यासंदर्भात नामदार बच्चू कडू यांचे स्वीय सहायक गौरव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव डॉ. सचेन गायकवाड यांच्यासह बैठक पार पडली. यावेळी रुग्णसेवक नयन पुजारी, संजय गायखे, उमेश महाडिक, नौशाद शेख, अमोल मानकर, सागर ननावरे, हरीश आवताडे, संतोष साठे, पंकज जगदाळे आदी रुग्णसेवक उपस्थित होते.

सदर बैठकीत रुग्णसेवक नयन पुजारी यांनी महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णालयांकडून शासकीय आरोग्य योजनांसंदर्भात गोरगरीब जनतेची होणारी पिळवणूक व फसवणूक याबाबत मुद्दा उपस्थित केला. तसेच सदर सर्व रुग्णालयांच्या नावांची यादीच त्यांनी उपसचिव डॉ. गायकवाड यांच्यासमोर सादर केली. यावेळी रुग्णालयांकडून कशाप्रकारे रुग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांचा मानसिक छळ करण्यात येतो याचा पाढाच त्यांचायसमोर वाचला. तसेच शासकीय आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कशा पळवाटा काढल्या जातात हेदेखील निदर्शनास आणून दिले.

यासंदर्भात उपसचिव डॉ. सचेन गायकवाड यांनी रुग्णसेवकांशी सविस्तर चर्चा करून अधिक माहिती घेतली. व ही अतिशय गंभीर बाब असून भविष्यात धर्मादाय रुग्णालयांच्या कारभारावर प्रशासनाची करडी नजर असेल. आरोग्य योजना न राबविणाऱ्या रुग्णालयांवर कायद्याचा बडगा उचलण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भरीव निधी उपलब्ध करून त्याचा गोरगरीब रुग्णांना कसा फायदा होईल याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन डॉ. गायकवाड यांनी प्रहार संघटनेच्या रुग्णसेवक कमिटीला दिले.

गौरव जाधव, नयन पुजारी, उमेश महाडिक, नौशाद शेख, अमोल मानकर, संजय गायके, सागर ननावरे, हरीश आवतडे, संतोष साठे, पंकज जगदाळे, जुन्नर तालुका  दिपक चव्हाण, अरूण शेरकर, सौरभ मातेले आदीसह उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा