Breaking


लखिपुर खेरी येथील शहीद शेतकरी पत्रकार यांच्या अस्थी कलशाला बार्शीत अभिवादन !


बार्शी : उत्तर प्रदेश येथील लखिपुर खेरी येथे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलाने शेतकरी, पत्रकाराच्या आंगावरती गाडी घालून चिरडून टाकलेल्या शहिदांना अभिवादन करणारी सभा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटना तसेच अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृह येथे 11 नोव्हेंबर 2021 रोजी झाली.


सोलापूर जिल्ह्यामध्ये ही शहीद अस्थी कलश यात्रा आली असता रिधोरे या गावांमध्ये आयटक ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने अभिवादन सभा घेण्यात आली. त्यानंतर श्रीपतपिंपरी येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अभिवादन सभा घेण्यात आली.

अस्थिकलाशा सोबत आलेले अखिल भारतीय किसान सभेचे राज्यसेक्रेटरी कॉम्रेड नामदेव गावडे म्हणाले, तीन काळे कृषी कायद्यासाठी चाललेली लढाई देशाच्या श्रमिकांसाठी ची अटीतटीची लढाई झालेली आहे, देश पुढील काळामध्ये श्रमिकांच्या बाजूने जाईल की भांडवलदारांच्या बाजूने जाईल याची स्पष्ट विभागणी या लढाईमुळे होईल,  शेती उद्योग कधी न बंद पडणारा उद्योग असल्याने त्यावर भांडवलदारांचा ताबा मिळवण्यासाठी, सहकार मोडून काढे, सोयाबीन, ऊसाला भाव न देणे, कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडणे हा त्यातलाच एक भाग आहे.

कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, शहिदाच्या रक्तातून लढायचे भाले निर्माण व्हावे, ज्याप्रमाने कॉम्रेड अमरशेख यांनी चार हुतात्म्यांचे स्मरण करून 15 हजारांचा मोर्चा काढला त्याचप्रमाणे पुढील लढाई तीव्र करत राहू.

अभिवादन सभेमध्ये 631 शेतकरी तसेच चार चिरडलेले शेतकरी व एक पत्रकार तसेच श्रीपत पिंपरी येथील कॉम्रेड शंकर बापू कदम यांना एक मिनिट उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

मंचावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड तानाजी ठोंबरे, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड नामदेव गावडे,  कॉम्रेड संजय, कॉम्रेड पाटील वाय एन पाटील,  कॉम्रेड लक्ष्मण घाडगे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एस. एस.जाधव, राष्ट्रवादीचे ऍड.सुप्रिया गुंड. ऍड. हर्षवर्धन बोधले, दलित महासंघाचे सुनील आवघडे, आयटक जगदाळे मामा हॉस्पिटल संघटनेचे लहु आगलावे, प्रा.डॉ. राजन गोरे, विवेक गजशिव, अनिस चे प्रा.हेमंत शिंदे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड डॉ. प्रविण मस्तुद,  रिधोरे या गावांमध्ये स्वागत करताना सरपंच विक्रमसिंह महाडिक, कॉम्रेड मुबारक मुलाणी, कॉम्रेड सतिश गायकवाड, सुरेश कुंभार, धनाजी आखाडे, संजय ओहाळ, मिथुन कदम, कॉम्रेड शौकत शेख, कॉम्रेड अनिरुद्ध नखाते, कॉम्रेड बालाजी शितोळे, कॉम्रेड धनाजी,  पवार, भारत भोसले, कॉम्रेड सुभाष पिंगळे, कॉम्रेड रामभाऊ कदम, कॉम्रेड रामेश्वर शिकेतोड, कॉम्रेड तानाजी काकडे, कॉम्रेड पैगंबर मुलानी, कॉम्रेड आनंद गुरव, कॉम्रेड किसन मुळे, पिंटू दळवी, कॉम्रेड पवन आहिरे, सुयश शितोळे, शुभम शिंदे, भारत पवार,आनंद धोत्रे,  विकास पवार आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा