Breaking


विक्रम गोखले व कंगना राणावत यांचे किती बापजादे देशासाठी शहीद झाले...मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत यांनी भारत स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे, तसेच कंगनाचा पद्मश्री पुरस्कार वापस घेण्याची देखील मागणी केली जात आहे. या प्रकरणावरून आमदार अमोल मिटकरी यांनी देखील कंगना राणावत व विक्रम गोखले यांच्यावर निशाना साधला आहे. तसेच, स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केल्या बद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून म्हटले आहे कि, विक्रम गोखले व कंगना राणावत यांचे किती बापजादे देशासाठी शहीद झाले त्याबद्दल त्यांनी खुलासा करावा. तसेच कंगना व तिच्या वक्तव्याचे समर्थन केल्याबद्दल व त्या समर्थनात स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केल्या बद्दल विक्रम गोखलेंंवर सुद्धा गुन्हा दाखल करावा.


तसेच, स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव कि अमृत महोत्सव यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष करणारे लोक, कंगना आणि विक्रम गोखलेंबाबत गप्प कसे? असाही प्रश्न आ. मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा