Breaking


जुन्नर : आधार लिंक नसल्याने रेशनिंग देण्यास टाळाटाळ, लोकभारती पक्षाचे तहसीलदारांना निवेदन


जुन्नर : आधार लिंक नसलेले रेशनिंग पासून वंचित असल्याने लोकभारती पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, जुन्नर तालुक्यातील बऱ्याच लोकांचे आधार लिंक नसल्याने त्यांना शिधा वाटप होत नाही. त्यांना धान्य देण्यात यावे, व न देणाऱ्यांवर कारवाई करावे. अन्यथा वेळप्रसंगी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा देण्यात आला आहे.

यावेळी लोकभारती पक्षाचे तालुका अध्यक्ष खालिद पटेल, जुन्नर शहर महिला अध्यक्ष रिना खरात, महिला उपाध्यक्ष शगुप्तां इनामदार, उपाध्यक्ष मुबिन जमादार, कार्याध्यक्ष रफिक तकि, आदीसह उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा