Breaking


जुन्नर : बोतार्डे येथे आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी !जुन्नर
 : आज दि.15 नोव्हेंबर 2021 रोजी आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती निमित्त आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर व रुपश्री महीला विकास संस्था जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने पेसा अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत बोतार्डे या गावी वसतिगृह विद्यार्थीनी व महिला, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

उलगुलान चळवळ, आदिवासी लढ्याचे आद्य क्रांतिकारक, सामजिक राजकीय जाणीव निर्माण करणारे बिरसां मुंडा  यानी सुरू केलेली चळवळ, जल जंगल, जमीन या न्याय हक्कांसाठी आजही आपला लढा चालू आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या मध्ये हक्कांसाठी लढा देण्याची जागृती निर्माण होत असते.

19 व्या शतकामध्ये महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध 'उलगुलान' चा नारा देऊन आदिवासींना संघटीत केले होते. 1894 साली छोट्या नागपूर परिसरातील भीषण दुष्काळात कर माफी आंदोलन व भरीव कार्य केल्याने लोक बिरसा मुंडा यांना  'धरती आबा' भगवान म्हणू लागले. 1898 मध्ये छोटा नागपूर भागात स्वराज, जंगलराज निर्माण करून आदिवासींमध्ये आत्मसन्मान व विश्वास प्रस्थापित केला 9 जानेवारी 1900 च्या दिवशी इंग्रजांनी डोंबारी बुरुज पर्वतावर हल्ला करून भीषण गोळीबार केला यामध्ये बिरसा बिरसा आपल्या साथीदारांना समवेत तीर-कामठे घेऊन तीव्र प्रतिकार केला परंतु त्यात 200 पेक्षा जास्त आदिवासी शहीद झाले यास 'डोंबारी बुरुज नरसंहार' म्हणून ओळखले जाते नऊ जून 1900 रोजी जेलमध्ये गूढरित्या वयाच्या 25 व्या वर्षी या महानायकाचा अंत झाला. यावेळी आदिवासी वसतिगृहाच्या गृहपाल अर्चना पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.


कार्यक्रमास स्वाती केदार, अमृता केदार, सायली केदार, सपना केदार, प्रियांका मरभळ, दिपाली कोकाटे, उज्वला मर भाळ, मंगल जाधव, अनुजा मरभळ, स्मिता बगाड, अश्विनी वाजे, स्वाती वाखुरे, गौरी मरभळ, पायल कोकाटे, आरती गांगड, रेश्मा गांगाड, सोनाली मरभळ यांचे सहकार्य लाभले. 

यावेळी विद्यार्थीनी महिलांसाठी टेलरिंग प्रशिक्षण कार्यक्रम सांगता समारोप व प्रमाणपत्र वितरण प्रसंगी उपस्थित होत्या.

‌यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, बोतार्डे गावचे सरपंच मच्छिंद्र केदार, बाळासाहेब आमले, दत्तात्रय आमले, आनंद आमले, रखमा गांगड आदीसह मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा