Breaking
जुन्नर : ऐतिहासिक वास्तूमध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे संविधान दिन उत्साहाने साजरा !


नारायणगाव : वारूळवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात भारतीय संविधान दिन वंचित बहुजन आघाडी कडून साजरा करण्यात आला. 


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २३ व २४ मे १९३१ रोजी नारायणगाव येथील शासकीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पहिली बहिष्कृत परिषद आयोजित केली होती. हि वास्तू ऐतिहासिक असल्याने या ठिकाणी आज(दि.२६) संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे तसेच कोनशीलेच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा सचिव गिरीराज वाव्हळ, सहसचिव गणेश वाव्हळ, सहसंघटक तथा जुन्नर तालुका महासचिव सागर जगताप, भारतीय बौद्ध महासभेचे जुन्नर तालुका अध्यक्ष अतिष उघडे, महासचिव अरविंद पंडित वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका अध्यक्ष जुबेर शेख, उपाध्यक्ष संतोष डोळस, महासचिव महेश तपासे, सचिव अल्पेश सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख संदेश वाव्हळ, संघटक मंदार कळंबे, वंचित बहुजन महिला आघाडी जुन्नर तालुका अध्यक्ष निलमताई खरात, कार्याध्यक्ष दिपाली थोरात, उपाध्यक्ष पूजा जगताप, कविता शेलार, पूजा सोनवणे, महासचिव पूनम दुधवडे, सहसचिव प्रिया शिंदे, शैला वाव्हळ, सर्पमित्र नागेश्वरी केदार, सुमित थोरात, बाबाजी शिरतर, गणेश सोनवणे, विशाल सोनवणे, सुनिल दुधवडे, रविभाऊ खरात, गौतम दुधवडे, रवी भोजने, विनोद पायाळ गौतम करंदीकर, वृषभ माळी इ. मान्यवर उपस्थित होते.

गणेश वाव्हळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. तसेच संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली थोरात यांनी केले तर आभार पुणे जिल्हा सचिव गिरीराज वाव्हळ यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा