Breaking


जुन्नर : केळी माणकेश्वर येथे विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप !


जुन्नर
 : आज केळी माणकेश्वर गावातील अंगणवाडी मधील तीन ते सहा वयोगटातील मुलांना गणवेश वाटप ऋषिकेश परिवाराच्या वतीने करण्यात आले. त्यावेळी ऋषिकेश परिवाराचे अध्यक्ष सुरेश जोशी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे सरपंच रामा भालचीम, तंटामुक्ती अध्यक्ष अविनाश शेळकंदे, गणपत जोशी, दाजी गोडे त्याचप्रमाणे अंगणवाडी शिक्षिका अंगणवाडी सेविका पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

ऋषिकेश परिवाराकडून नेहमीच चांगले उपक्रम समाजासाठी राबवले जात असतात. लहान विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊ वाटप केल्याबद्दल ऋषिकेश परिवाराचे केळी माणकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा