Breaking


जुन्नर : वडगांव कांदळी व निमगाव सावा येथे विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा संपन्न !


जुन्नर : सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत मंजूर झालेल्या ०९ कोटी ८२ लक्ष १२ हजार ७८६ रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार अतुल बेनके व जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वडगाव कांदळी व निमगाव सावा याठिकाणी आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.


दळणवळणाच्या सोयी या आर्थिक तसेच भौगोलिक विकासाच्या नाड्या असतात. जुन्नर तालुक्याच्या सर्वांगिण विकासात महत्वाचा वाटा हा तालुक्यातील वाटांचा देखील आहे. सध्याच्या कालखंडात दळणवळण खूप वेगाने होत आहे आणि दळणवळणाची साधनेही वेगाने बदलत आहेत. चार चाकी गाड्यांची वाढती संख्या त्यामुळे दळणवळणाला आलेला वेग या सर्व बाबी लक्षात घेऊन रस्ते रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. 

राज्यमार्ग ६० पुणे नाशिक हायवे (जांबुतफाटा) ते साळवाडी-बोरी-बेल्हे रस्ता रुंदीकरण  ४ कोटी, ८७ लक्ष, ०७ हजार, ७५३ रूपये, निमगाव सावा - जांबुत रस्ता रुंदीकरण करणे २ कोटी २५ लक्ष ०५ हजार ३३ रुपये, कारफाटा ते मंगरूळ फाटा रस्ता रुंदीकरण करणे २ कोटी, ५० लक्ष रुपये, या विकासकामांचे भूमिपूजन आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी वडगावचे सरपंच रामदास पवार, संजय खेडकर, माऊली निलख, कांदळी गावचे सरपंच विक्रम भोर, अशोक बढे, बाळासाहेब बढे, साळवाडीचे उपसरपंच महेश काळे, संभाजी काळे, कालवा सल्लागार समिती सदस्य अशोक घोडके, पं.स.सदस्य शामराव माळी, विजय कुऱ्हाडे, प्रदीप पिंगट, नवनाथ नेन्द्रे यांसह वडगाव, कांदळी, साळवाडी बोरी (बु.), बेल्हे गावचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा